Ad will apear here
Next
औषधभान
‘ग्राहकांमध्ये औषधांबाबतची जागरुकता, डोळसपणा व योग्य माहिती असणे आवश्यक आहे. औषध तेच, पण योग्य मात्रेत जबाबदारीने वापरले, तर अमृत, नाहीतर होते एक विष’, असे प्रा. मंजिरी घरात यांनी म्हटले आहे. जबाबदारीने वापरणे म्हणजे औषधसाक्षरता. या पुस्तकात त्यांनी वाचकांना औषधसाक्षर केले आहे. प्रिस्क्रिप्शन कसे वाचावे, यापासून त्या सुरुवात करतात. औषधे घेण्याच्या वेळा, अँटिबायोटिक्स म्हणजे काय, द्रव औषध कशी घ्यावीत, आयड्रॉप्स कसे वापरावेत अशा मुद्द्यांचा त्या वेध घेतात.

बीपी, डायबेटिस, कोलेस्टेरॉल अशी दुखणी असलेल्या रुग्णांनी कशी काळजी घ्यावी, याविषयी सल्ला देतात. मानसिक आजार आणि औषधे या महत्त्वाच्या विषयावरही त्या प्रकाश टाकतात. याव्यतिरिक्त जेनेरिक औषधे, पिल्स आदींची माहितीही देतात. पुस्तकात वेबसाइट्स, पत्ते आणि फॉर्म्सचाही समावेश आहे.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १२६  
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZMNBP
Similar Posts
मेनोपॉज मेनोपॉजचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अत्यंत नाजूक काळ असतो. या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल होत असतात, तसेच तिच्या भावविश्वात. या काळाला सहजतेने सामोरे जाण्यासाठी काय करावे, याचे शास्त्रीय मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी या पुस्तकातून केले आहे.
काय खाऊ, किती खाऊ? काय खावे हा प्रश्न अनेकांना पडतो. पोषणमूल्य असलेले पदार्थ खाणे नेहमीच हितकारक ठरते. आजारपणातही आहाराला महत्त्व असते. शिवाय आजाराच्या स्वरूपानुसार आहारही बदलत असतो. कोणत्या वेळी कोणता आहार घ्यावा यावर डॉ. वैशाली मंदार जोशी यांनी ‘काय खाऊ, किती खाऊ?’मधून मार्गदर्शन केले आहे.
संपूर्ण शाकाहारी सुरुची आयुष्यभराचा सोबती असे या पुस्तकाचे वर्णन करायला हरकत नाही. कारण इंदिरा परचुरे यांनी १४०० हून अधिक पारंपरिक व आधुनिक पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
सांस्कृतिक भारत- भारतीय राज्यांची संक्षिप्त ओळख भारताची संस्कृती काही पानांत सामावणे अवघडच. या संस्कृतीची तोंडओळख करून देण्याचे काम सांस्कृतिक भारत हे डॉ. सुधीर देवरे यांचे पुस्तक करते. यात देशातील सर्व राज्ये, तेथील भाषा, लोकसंख्या, विभाग आदींची माहिती आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्ये, तेथील जाती-जमाती आणि प्रमुख बोलीभाषा यांची सविस्तर माहिती पुस्तकात मिळते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language